कर्जमाफीबद्दल शेतकर्‍यांना दिलासादायक वार्ता


नागपूर :
शेतकरी वर्गाला दोन टप्प्यात कर्जमाफीचा लाभ देण्याचा सरकारचा विचार आहे. फडणवीस सरकारच्या काळात ऑनलाइन कर्जमाफीवरुन उडालेला गोंधळ आणि कर्जमाफीस झालेला विलंब यामुळे शेतकरी वर्गात मोठी नाराजी पसरली होती. त्यामुळे पुन्हा ऑनलाइनच्या फंदान न पडण्याचा विचार विद्यमान सरकारकडून घेतला जाण्याची शक्यता आहे.
कर्जमाफीचा पहिला टप्पा अर्थिक वर्ष संपण्यापूर्वीच (मार्च 2020) दिला जाण्याची आपेक्षा ठाकरे सरकारकडून आहे तर दुसरा टप्पा एप्रिल 2020 मध्ये दिला जाण्याचा अंदाज आहे.

सरकारकडून कर्जमाफीचा आढावा घेण्यासाठी टीम नियुक्त करण्यात आली आहे. आनॅलाइन कर्जमाफीऐवजी ऑफलाईन कर्जमाफी देण्यावर विद्यमान सरकारचा भर राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शेतकरी कर्जमाफीबद्दल अधिवेशनात सरकार आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु असताना ही बातमी शेतकरी वर्गाला दिलासा देणारी ठरणार आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here