अवकाळी पावसाने पिकांचे नुकसानीची सरकारने भरपाई द्यावी : अजित पवार

मुंबई : राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत आणि नुकसान भरपाई देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी केले. याबाबत प्रसार माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले की, ‘गेल्या तीन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा मुद्दा आम्ही विधानसभेत मांडणार आहोत. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत आणि नुकसान भरपाई देण्यासाठी पुढे आले पाहिजे. शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याच्या मुद्द्यावर आम्ही विधानसभेत स्थगितीची नोटीस दिली आहे, असे पवार म्हणाले.

गेल्या तीन दिवसात राज्यात सर्वत्र पावसाचा अंदाज होता. त्यामुळे सरकारने शेती विम्याचे दाव्यांचा लाभ प्रत्यक्ष मिळण्यावर भर दिला पाहिजे, असे पवार यांनी सांगितले. २८ फेब्रुवारी रोजी, कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांनी कांद्याला योग्य भाव देण्याची मागणी केली होती. याबाबत विरोधी पक्षाच्या आमदारांनी गदारोळ केल्याने महाराष्ट्र विधान परिषद तहकूब करण्यात आली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, शेतकरी प्रश्नावर सरकारकडे चर्चेची मागणी केली जात होती. मात्र सरकारने त्यास नकार दिल्याने परिषद तहकूब करण्यात आली.

दरम्यान, कांद्याला योग्य भाव मिळावा, अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डोक्यावर कांदे घेऊन आणि कांद्याचे हार घालून महाराष्ट्र विधानसभेत पोहोचले. विधानसभेचे चार आठवड्यांचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारीपासून सुरू झाले असून ते २६ मार्चपर्यंत चालणार आहे. ९ मार्च रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here