महाराष्ट्रात आतापर्यंत ४९२ लाख क्विंटल साखर उत्पादन

महाराष्ट्रातील गाळप हंगामाने आता गती घेतली आहे. साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार, हंगाम २०२१-२२ मध्ये ४ जानेवारी २०२२ अखेर महाराष्ट्रात एकूण १८९ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये ९५ सहकारी तर ९४ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ५०५.९१ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. तर ४९२.९७ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ९.७४ टक्के आहे.

नव्या वर्षात कोल्हापूर विभागात साखर उतारा ११ टक्क्यांवर पोहोचला आहे. आणि राज्यात सर्वाधिक साखर उत्पादन याच विभागात झाले आहे. कोल्हापूर विभागात १२१.७६ लाख टन उसाचे गाळप झाले असून १३४.८४ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. येथील साखर उतारा ११.०७ टक्के आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक ४४ साखर कारखाने सोलापूर विभागात सुरू आहेत. साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार ४ जानेवारी २०२२ अखेर सोलापूर विभागात १२०.६७ लाख टन उसाचे गाळप झाले असून १०६.४२ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. येथील साखर उतारा ८.८२ टक्के आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here