महाराष्ट्रात विविध विभागांतील साखर कारखाने चांगली कामगिरी करत आहेत. राज्यात चालू हंगामात गेल्यावर्षीच्या तुलनेत जादा साखर कारखाने सुरू आहेत.
साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार २०२१-२२ या हंगामात ३१ जानेवारी २०२२ पर्यंत महाष्ट्रात एकूण १९४ कारखान्यांकडून गाळप सुरू आहे. यामध्ये ९६ सहकारी तर ९८ खासगी कारखाने कार्यरत आहेत. ७२४.९१ लाख टन उसाचे गाळप सुरू आहे. राज्यात आतापर्यंत ७२९.०२ लाख क्विंटल साखर उत्पादन सुरू आहे. राज्यात आतापर्यंत सरासरी साखर उतारा १०.०६ टक्के आहे.
राज्यात सर्वाधिक साखर कारखाने सोलापूर विभागात सुरू आहेत. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ४५ कारखान्यांकडून गाळप सुरू आहे. येथे ३१ जानेवारी २०२२ पर्यंत १७२.१६ लाख क्विंटल ऊस गाळप झाले असून १५५.९८ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.
राज्यात सर्वात अधिक साखर उत्पादन कोल्हापूर विभागात झाले आहे. कोल्हापूर विभागात एकूण १७२.२५ लाख टन ऊस गाळप करून १९७.४३ लाख क्विंटल साखर उत्पादन करण्यात आले आहे. येथे साखर उतारा ११.४६ टक्के आहे.