बातम्या वाचू नका ऐकाही, बातम्या वाचणे झाले एकदम सोपे ,आत्ता बातम्या वाचणे आणि ऐकणे झाले एकत्रच
पुणे : चीनी मंडी
भारतातील बाजारपेठेत साखरेला उठाव नाही, तर आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला चांगला दर नाही. अशा परिस्थितीत देशात साखरेचा साठा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाचे साखर उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रात २६ हजार कोटी रुपयांची साखर केवळ गोदामांमध्ये पडून आहे. हा साठा ८९ लाख ५१ हजार टन आहे.
दरम्यान, साखरेची भारतातील किमान विक्री किंमत २९०० रुपये आहे. यात वाढ करण्याची मागणी साखर कारखान्यांकडून होत असताना, केंद्राकडून त्या मागणीला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे ऊस उत्पादकांच्या एफआरपीचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता साखर कारखान्यांचे डोळे सरकार किमान विक्री किंमत वाढवेल याकडे लागले आहेत.
राज्यात ऊस गाळप हंगाम सुरू होताना ५३.३६ लाख टन साखर साठा शिल्लक होता. यंदाच्या हंगामात ऑक्टोबर २०१८ ते जानेवारी २०१९ या काळात ७० लाख टन साखर उत्पादित झाली, त्यामुळे एकूण साठा १२३ लाख टनापर्यंत गेला. पण, याच काळात जवळपास ३२ लाख टन साखरेची विक्रीही झाली. तसेच दीड लाख टन साखर निर्यातही झाली आहे. त्यामुळे जानेवारी अखेर ८९ लाख टन साखर राज्यात शिल्लक असल्याची माहिती राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खटाळ यांनी सांगितले.
साखरेचा प्रत्यक्ष उत्पादन खर्च आणि त्याला असणारी किंमत यामधील तफावतीमुळे साखर उद्योगाला मोठा फटका बसत असल्याचे खटाळ यांनी सांगितले. सध्या उत्पादन खर्च ३४०० रुपयांच्या आसपास आहे. तर, साखरेची किमान विक्री किंमत २९०० रुपये आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना एफआरपीचे पैसे देण्यास अडचणी येत आहेत, अशी माहिती खटाळ यांनी दिली.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp