महाराष्ट्र :राज्याच्या काही भागात जोरदार पावसाचा अंदाज

मुंबई : हवामान विभागाने राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने आजसाठी विदर्भातील जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट दिला. तर मराठवाड्यातही सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. खानदेशातही येलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची उघडीप राहील, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली.

धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात उद्यापासून काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्याच्या इतर भागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. शुक्रवारपासून विदर्भातही पाऊस उघडीप देण्यात शक्यता आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवसांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर म्हणजेच पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here