मुंबई: भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. शुक्रवार आणि शनिवारी मुसळधार पाउस आणि चक्रीवादळ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसे झाल्यास रेल्वे, रस्ते आणि हवाई वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील पालघर भागातही शुक्रवारी सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. IMD च्या मते, येत्या 3-4 तासांत मुंबईत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. IMD ने पालघर परिसरासाठी ऑरेंज अलर्ट तर ठाणे आणि रायगड भागात येलो अलर्ट जारी केला आहे.
12 जुलैपर्यंत मुंबईत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला होता. पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, जुलैपर्यंत नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळमध्ये मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.