मुंबई : एकीकडे २०२० मध्ये लागू झालेल्या कडक लॉकडाउनमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेत घसरण दिसून आली तर दुसरीकडे कृषी क्षेत्र मजबूतीने उभारल्याचे चित्र दिसून आले. २०१९च्या तुलनेत २०२० मध्ये खरीप अन्नधान्य उत्पादन ४९ टक्क्यांनी वाढल्याचे दिसले. खरीप हंगामातील आकडेवारीनुसार, तृणधान्यांचे उत्पादन ५९ टक्के, कडधान्यांचे उत्पादन १९ टक्के तर तेलबियांचे उत्पादन २८ टक्के वाढले. याशिवाय मुख्य नकदी पिक असलेल्या ऊस आणि कापसाच्या उत्पादनात ४४ टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले.
राज्यात खरीप हंगाम अथवा मान्सूनचा कालावधी हा पिकांचा मुख्य काळ मानला जातो. राज्य सरकारने गुरुवारी राज्यातील आगामी हंगामाचा आढावा घेतला. आगामी हंगामात राज्यात जादा मान्सूनमुळे शेतीक्षेत्रात वाढ आणि सरासरी उत्पादनातही वाढीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
२०१९-२० मधील आकडेवारीवरून खरीप धान्य उत्पादनात ६१.८ लाख टनावरून ९२ लाख टनापर्यंत वाढ झाल्याचे दिसते. तृणधान्यांचे उत्पादन ४६.५ लाख टनावरून वाढून ७३.८ लाख टन झाले. तर डाळींचे उत्पादन १५.४ लाख टनावरून १८.३ लाख टनावर पोहोचले. तेलबियांचे उत्पादन ५०.३ लाख टनावरून ६४.६ लाख टनावर आले. ऊसाचे उत्पादन ६९३ लाख टनावरून १००० लाख टन झाले. तर कापसाचे उत्पादन ६६.४ लाख गाठींवरुन ९५.५ लाख गाठींवर पोहोचले.
आगामी २०२१ च्या खरीप हंगामात मॉन्सूनची स्थिती चांगली राहील अशी शक्यता आहे. शेती क्षेत्र १५१ लाख हेक्टरवरुन १५७.२ लाख हेक्टरपर्यंत पोहोचेल. त्यामुळे उत्पादनातही वाढीची शक्यता आहे. खरीप हंगामात राज्यात अन्नधान्याचे उत्पादन ७१.५ लाख टनावरुन १०८.४ लाख टनावर पोहोचेल. तर तृणधान्याचे उत्पादन ५८.३ लाख टनावरून ८५ लाख टनापर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. डाळींचे उत्पादन सरासरी १३.३ लाख टनावरुन २३.५ लाख टन होण्याची अपेक्षा आहे. हंगामात तेलबियांचे उत्पादन सरासरी ३५.८ लाख टनावरुन ६० लाख टन होण्याची शक्यता असून उसाचे उत्पादन ७७५.५ लाख टनावरुन ९०३.५ लाख टन होण्याची अपेक्षा आहे.