महाराष्ट्र: स्थलांतरित ऊसतोडणी मजुरांना सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ देण्याचे निर्देश

मुंबई : स्थलांतरित ऊस तोडणी मजुरांना सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय राखून काम करण्याची गरज आहे असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. तोडणी मजुरांच्या मुलांसाठी वसतिगृह स्थापन करण्याबाबतही त्यांनी निर्देश दिले.

मंत्री धनंजय मुंडे यांनी ऊस तोडणी मजुरांच्या कल्याणासाठी दिवंगत गोपिनाथ मुंडे ऊस तोडणी कामगार महामंडळ सुरू करण्याची मागणी केल्यानंतर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पवार यांनी सांगितले की, राज्यातील सुमारे १०१ सहकारी आणि ८७ खासगी साखर कारखान्यांमध्ये जवळपास आठ ते दहा लाख ऊस तोडणी मजूर राज्याच्या विविध भागातून या जिल्ह्यांमध्ये जातात. या स्थलांतरित तोडणी मजुरांपर्यंत सामाजिक सुरक्षेच्या सर्व योजनांच्या माध्यमातून लाभ पोहोचण्याची गरज आहे.

यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्य मंत्री राजेश टोपे, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ, कृषी मंत्री दादा भुसे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीजचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here