Maharashtra Interim Budget 2024 : सर्व कृषी पंपांची थकित वीजबिले माफ, ‘लाडकी बहीण’ योजनेची घोषणा

मुंबई : महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे.दरम्यान, आज अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत, तर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांच्याकडून अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या.राज्यातील ४६ लाख ६ हजार शेती पंप धारक, एवढे शेतकरी साडेसात हॉर्सपावर पर्यंत मोटार चालवतात. त्यावरही आणखी काही शेतकरी आहेत.त्यांचा वीज माफीचा निर्णय राज्य सरकारने घेतला.

मध्य प्रदेशातल्या लखपती दीदी प्रमाणेच महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेची घोषणा त्यांनी केली. महिलांना केंद्र स्थानी ठेवून आपण प्रगतीची वाटचाल सुरु केली.महिलांना पोषण आहार, रोजगार, कौशल्य यासाठीच्या योजना राबवणार आहो असं त्यांनी म्हटले. त्याचप्रमाणे लेक लाडकी योजना, जननी सुरक्षा योजना, पंतप्रधान मातृयोजना आपण आणल्या आहेत असंही अजित पवारांनी स्पष्ट केले.

अजित पवार यांनी सांगितले कि, महिलांचं आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वावलंबन यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वय वर्षे २१ ते ६० या वयोगटातील महिलांसाठी राबवण्यात येईल. या योजनेच्या अंतर्गत महिलांना दर महा १५०० रुपये देण्यात येतील. या योजनेसाठी ज्या महिला पात्र आहेत त्यांना हा निधी मिळेल. या योजनेसाठी ४६ हजार कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला जाईल. जुलै २०२४ म्हणजेच पुढच्या महिन्यापासून ही योजना लागू करण्यात येईल.

मुलींमध्ये उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. यासाठी ८ लाख वार्षिक उत्पन्नाची मर्यादा तसंच आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थिनींना पदवी शिक्षणासाठी १०० टक्के शुल्क माफ करण्यात येणार ही घोषणा करण्यात आली. स्वयंपाकातील इंधनाचा आणि महिलांच्या आरोग्याचा जवळचा संबंध असतो. गॅस सिलिंडर घराला परवडेल यासाठी पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत दिले जातील.

महिलांच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे

राज्यात १० हजार पिंक रिक्षा महिलांसाठी देण्यात येतील.

महिलांना बस प्रवासात सवलत.

महिलांना मुद्रांक शुल्कात सवलत.

वर्षाला एका कुटुंबाला ३ सिलेंडर मोफत दिले जातील.

बचत गटाच्या निधीत १५ हजारांवरुन ३० हजार निधी

यावर्षी २५ लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचा शासनाचा विचार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here