महाराष्ट्र : राज्यात ऊस गाळपात कोल्हापूर विभाग आघाडीवर

कोल्हापूर : राज्यातील गळीत हंगाम सध्या अंतिम टप्प्यात आला आहे. आतापर्यंत राज्यात १० कोटी १२ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. यामध्ये कोल्हापूर विभागात सर्वाधिक उसाचे गाळप झाले आहे. सर्वात कमी गाळप नागपूर विभागात झाले आहे. गळीत हंगामात सहभागी झालेल्या २०७ कारखान्यांनी आतापर्यंत १० कोटी २८ लाख क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे.

गेल्यावर्षी गाळप हंगामात १० कोटी ३८ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले होते. यंदा पाऊस कमी पडल्याने उसाचे क्षेत्र कमी झाले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी २६ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप कमी झाले आहे.यंदाच्या वर्षी नोव्हेंबरपासून उसाचे गाळप सुरू झाले. सध्या जिल्ह्यासह राज्यातील बऱ्याच साखर कारखान्यांचे गाळप बंद झाले आहे. काही कारखाने सुरू आहेत. येत्या काही दिवसांत ते बंद होतील.

कोल्हापूर विभागात दोन कोटी ३२ लाख टन ऊस गाळप झाले आहे. तर विभागाने दोन कोटी ६६ लाख ८४ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. पुणे विभाग दोन कोटी २३ लाख ६१ हजार मे. टन ऊस गाळप करून दोन कोटी ३२ लाख २४ हजार क्विंटल साखर उत्पादन घेऊन द्वितीय क्रमांकावर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here