महाराष्ट्र : मजूर गुंतले निवडणुकीत, गळीत हंगाम आणखी आठवडाभर लांबण्याची शक्यता

मुंबई : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष साखर कारखान्यांच्या गळीत हंमागाकडे लागले आहे. मात्र, विधानसभेचे मतदान २० नोव्हेंबर रोजी होत आहे. राज्य सरकारने १५ नोव्हेंबरनंतर साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू करावेत, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे दिवाळी संपल्याने १५ नोव्हेंबरपूर्वी ऊस तोड मजूर कारखाना तळावर येतील, असा अंदाज होता. मात्र, २० नोव्हेंबरला मतदान असल्याने मराठवाड्यातील मजूर तिथे अडकून पडणार आहेत. त्यामुळे हंगाम साधारणपणे २५ नोव्हेंबरनंतरच सुरू होईल अशी शक्यता आहे.

मराठवाड्यातून ऊस तोडणी मजुरांना सोडले जाऊ नये याची खबरदारी सर्वच राजकीय पक्ष घेत आहेत. आपल्या हक्काचे मजूर मतदार जाऊ नयेत, म्हणून उमेदवारांनी दक्षता घेतली आहे. मतदान झाल्यानंतरच त्यांना आपापल्या जिल्ह्यातून सोडले जाऊ शकते. त्यामुळे एक डिसेंबरपासूनच गळीत हंगामाला गती येणार आहे. हंगाम उशिरा सुरू झाल्याचा त्याचा फटका शेतकऱ्यांना बसेल. हंगामात पहिल्यांदा दीड महिन्यात आडसाली व सुरुच्या लागणीची तोडणी होणार आहेत. सद्यस्थितीत बहुतांशी साखर कारखानदार विधानसभेच्या रिंगणात आहेत. त्यामुळे निवडणूक निकालानंतर म्हणजेच २५ नोव्हेंबरनंतरच अनेक साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होणार आहे.

साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here