मुंबई: महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून राज्यभरात कर्फ्यूची घोषणा केली आहे. यादरम्यान, आवश्यक सेवा वगळता सर्व सार्वजनिक कामांवर बंदी असेल. सरकारने राज्यात कोरोनाची स्थिती गंभीर झाल्याने हा निर्णय घेतला आहे. गेल्या २४ तासांत देसभरात कोरोनाचे १.८५ लाख नवे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात ६० हजार रुग्ण आहेत. महाराष्ट्रातील स्थिती पाहता लॉकडाउनची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियावरून राज्यातील लोकांशी संवाद साधत पूर्ण लॉकडाउन लागू केला नसून १५ दिवसांसाठी कर्फ्यू लागू केल्याची घोषणा केली. बुधवारी रात्री आठ वाजल्यानंतर याची अंमलबजावणी होईल. एक मे रोजी सकाळी सात वाजेपर्यंत हे नियम लागू असतील. लॉकडाउनसारखे नियम राज्यात लागू आहेत. याशिवाय राज्यात कलम १४४ ही लागू कर्यात आले आहे. त्या अंतर्गत सार्वजनिक ठिकणी पाच अथवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई केल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात लॉकडाऊन शब्दाचा वापर केला नाही. कोरोना व्हायरसविरोधात पुन्हा एकदा युद्ध सुरू झाले आहे. महारामीमुळे आरोग्य यंत्रणेवर दबाव वाढल्याचे त्यांनी सांगितले. गरीब तसेच गरजूंना राज्य सरकार तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ देईल. केंद्र सरकारने ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा वाढविण्याची मागणीही त्यांनी केली.
हे सुरू राहणार
– कर्फ्यूदरम्यान आवश्यक सेवांना मुभा, औषध दुकाने सुरू राहतील. खाद्यपदार्थांची होम डिलिव्हरी
– आवश्यक सेवांशी जोडलेल्या व्यक्तींसाठी परिवहन सुविधा, ई-कॉमर्स कंपन्या आणि उत्पादन ठिकाणी कामास सूट
– खुल्या मैदानात राजकीय मेळाव्यात २०० चा सहभाग शक्य, हॉलमधील कार्यक्रमांना ५० टक्के क्षमतेची अट
हे बंद राहाणार
– धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांना प्रतिबंध
– सलून, स्पा, शाळा, कॉलेज, खासगी कोचिंग सेंटर, समुद्र किनारे, क्लब, स्वीमिंग पूल, जीम, सिनेमागृहे बंद
– सिनेमा, टीव्ही सीरियल्स, जाहिरातींच्या शूटींगवर बंदी