पुणे : महाराष्ट्रात या हंगामात उच्चांकी साखर उत्पादनाची अपेक्षा आहे. फायनान्शिअल एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले की, चालू हंगामाच्या अखेरपर्यंत महाराष्ट्रात उच्चांकी ११५ लाख टन साखर उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्राच्या २०२१-२२ या साखर हंगामाने अंतिम टप्प्यात प्रवेश केला आहे. यामध्ये ८ फेब्रुवारीपर्यंत साखर कारखान्यांनी ७८८.५४ लाख टन उसाचे गाळप करुन ७९८.७९ लाख क्विंटल साखर उत्पादन केले आहे. याचा सरासरी साखर उतारा १०.१३ टक्के आहे.
या हंगामात १०९६ लाख टन ऊस उपलब्ध आहे. गेल्या हंगामात महाराष्ट्राने १०१४ लाख टन उसाचे गाळप केले होते. १०६ लाख टन साखरेचे उत्पादन करण्यात आले होते. या हंगामात जवळपास १९७ कारखान्यांनी सहभाग घेतला आहे.
प्रसार माध्यमातील वृत्तानुसार, त्यांनी सांगितले की, पुढील २० दिवसांत कारखाने बंद होऊ लागलीत. तर जवळपास ६८ कारखाने मार्चच्या अखेरपर्यंत कामकाज बंद करतील. गायकवाड यांनी सांगितले की, उर्वरीत ६८ कारखाने एप्रिलच्या अखेरपर्यंत सुरू राहतील. तर उर्वरीत ४३ कारखाने ३१ मेपर्यंत ऊस गाळप करतील. पूर्ण गळीत हंगाम १४५ दिवसांचा आहे. काही कारखान्यांना गाळपासाठी सर्वाधिक २८८ दिवसांची गरज असते. तर काही कारखाने ९७ दिवसांत गाळप पूर्ण करू शकतात.