महाराष्ट्र : कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के

कोल्हापूर : बुधवारी कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली आणि सातारा जिल्ह्यात आज भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 5 किमी खाली होता. कोल्हापुरात 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली . भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी  06:45:05 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.

कोल्हापूरपासून 76 किमी अंतरावर चांदोली अभयारण्य परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील पाटण शहरासह लगतच्या गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. पहाटे 6.40 मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. कोयना धरणापासून 20 किलोमीटर अंतरावर भूकंप धक्के जाणवले असून धरण सुरक्षित आहे. भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कोल्हापूर सातारासह सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चांदोली अभयारण्य परिसरापासून 15 किमी परिसरात सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here