पुणे : प्रदीर्घ मान्सूनमुळे महाराष्ट्राचा २०२२-२३ चा ऊस गाळप हंगाम सुरू होण्यास किमान पंधरवडा उशीर होण्याची शक्यता आहे. यंदाही राज्यात ऊस आणि साखरेचे चांगले उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. गाळप करण्यास होणारा विलंब साखर कारखानदारांबरोबरच प्रशासनासाठीही आव्हान ठरू शकतो, असे साखर क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
इकॉनॉमिक टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ म्हणाले, की, “आम्हाला एक ऑक्टोबरपासून गाळपाचे काम सुरू करायचे होते. मात्र, सरकारने १५ ऑक्टोबरपासून गाळप सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, ओल्या शेतात ऊस तोडणी करणे शक्य नसल्याने गाळप सुरू करणे कठीण बनले आहे.
याबाबत, कोल्हापूरचे साखर व्यापारी घोरपडे म्हणाले, “जर यानंतर पाऊस न झाल्यास नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून कारखान्यांचे कामकाज सुरू होईल, अशी शक्यता आहे.