महाराष्ट्र : या आठवड्यात मान्सून विस्तारणार, राज्यात जोरदार बरसणार पाऊस

मुंबई : महाराष्ट्रात या आठवड्यात मान्सूनची पूर्ण ताकदीने कार्यरत होताना दिसून येईल. या दरम्यान आकाशात ढग दाटून राहतील आणि मध्ये-मध्ये पाऊस कोसळेल. राज्यात मान्सून सक्रिय झाल्यानंतर पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. तापमानात घसरण नोंदविण्यात आली आहे. आतापर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात याचा परिणाम दिसून आला आहे. मात्र, भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या म्हणण्यानुसार आगामी काही दिवसांत संपूर्ण राज्यभरात मान्सूनचा प्रभाव दिसू शकेल. सध्या पावसाची स्थिती पाहता आयएमडीने अलर्ट जारी केला आहे.

याबाबत एबीपी लाइव्हने दिलेल्या वृत्तानुसार, दुसरीकडे राज्यातील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक बहतांश शहरात चांगला ते मध्यम श्रेणीत दिसून आला आहे. मुंबईत सोमवारी कमाल तापमान ३३ तर किमान तापमान २५ डिग्री सेल्सिअस राहील अशी शक्यता आहे. आठवडाभर ढगाळ वातावरण असेल. पावसाचीही शक्यता आहे. हवेचा गुणवत्ता निर्देशांक चांगल्या श्रेणीत आहे. पुण्यात कमाल तापमान ३५ तर किमान तापमान २५ डिग्री सेल्सिअस राहील. येथील वातावरणही मुंबईसारखेच असेल. हवेची गुणवत्ता चांगल्या श्रेणीत नोंदली गेली आहे. नागपूरमध्ये कमाल तापमान ३९ तर किमान तापमान २७ डिग्री सेल्सिअस राहील. हवामान ढगाळ राहणार असून पावसाचीही शक्यता आहे. हवेची गुणवत्ता समाधानकारक स्थितीत आहे. औरंगाबादमध्ये कमाल तापमान ३४ तर किमान तापमान २३ डिग्री सेल्सिअस आहे. आठवडाभर ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता आहे. हवेची गुणवत्ता चांगल्या श्रेणीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here