मुंबई : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने राज्य सरकार महत्त्वाचे निर्णय घेत आहे. या अंतर्गत शुक्रवारी महाराष्ट्र सरकारने यूरोप आणि मध्य-पूर्व तसेच दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या लोकांसाठी आरटी-पीसीआर चाचणीच्या निगेटिव्ह रिपोर्टची सक्ती केली आहे. मात्र या कालावधीत प्रवाशांना क्वारंटाईन राहण्यापासून दिलासा दिला आहे. या नागरिकांना निगेटिव्ह रिपोर्ट असल्यास चौदा दिवस क्वारंटाईन रहावे लागणार नाही. महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारने केंद्र सरकारच्या एसओपीनुसार हा निर्णय घेतला आहे
राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी हा आदेश जारी करताना सांगितले की, युरोपियन देश आणि दक्षिण आफ्रिकेतील प्रवाशांसह राज्यात प्रवेश करणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना लागू करण्यात येणारे नियम केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अनुसार असतील. याचा अर्थ त्यांना राज्यात प्रवेश करताना निगेटिव्ह आरटी-पीसीआर चाचणी अहवाल गरजेचा आहे. हा अहवाल विमान येथे लॅंडिंग करण्यापूर्वी ७२ तासातील असला पाहिजे.
१५ जुलै रोजी राज्य सरकारने कोरोना विरोधी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना महाराष्ट्रात प्रवेश करण्याची परवानगी दिली आहे. त्यासाठी त्यांच्याकडे पंधरा दिवसांपूर्वीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. लस घेतलेल्या नागरिकांना निगेटिव्ह रिपोर्टची अट शिथिल करण्यात आली होती. यादरम्यान देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ दिसून येत आहे. देशात शनिवारी सकाळी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासात ४६७५९ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ५०९ जणांचा मृत्यू झाला आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link