महाराष्ट्र : अतिरिक्त ऊस उत्पादनाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली चिंता

सोलापूर : सोलापूरमधील अतिरिक्त ऊस उत्पादनावर चिंता व्यक्त करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी साखर कारखानदारांना साखर उत्पादन कमी करून इथेनॉल उत्पादन वाढविण्याचा आग्रह केला. गडकरी यांनी सोमवारी राष्ट्रीय महामार्ग योजनेच्या शिलान्यास समारंभासाठी सोलापूरमध्ये आले होते. मंत्री गडकरी म्हणाले, जर अशा पद्धतीने साखर उत्पादन सुरू राहीले तर शेतकऱ्यांसमोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नसेल. यांदरम्यान नवीन सरकारी आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये भारताची साखर निर्यात ६४.९ टक्के वाढून ४.६ बिलियन डॉलर झाली आहे. गेल्यावर्षी ती २.७९ बिलियन डॉलर होती.

वाणिज्य आणि सांख्यिकी महासंचालनालयाद्वारे (डीजीसीआयएस) जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार भारताने मार्च २०२२ मध्ये समाप्त झालेल्या आर्थिक वर्षात जगभरात १२१ देशांना साखर निर्यात केली. ब्राझीलनंतर भारत जगातील द्वितीय क्रमांकाचा साखर उत्पादक देश आहे. २०१०-११ नंतर भारताने सतत अतिरिक्त साखर उत्पादीत केली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने आपल्या एका निवेदनात म्हटले आहे की, उच्चांकी साखर निर्यातीमधून आपल्याला कमी साठा करण्यास मदत मिळेल आणि शेतकऱ्यांनाही फायदा होईल. कारण भारतीय साखरेच्या वाढत्या मागणीनंतर त्यांच्या उत्पन्नात सुधारणा होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये देशाच्या एकूण ८० टक्के साखर उत्पादन होते. देशातील आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, बिहार, हरियाणा आणि पंजाब ही उर्वरीत ऊस उत्पादक राज्ये आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here