महाराष्ट्र : साखरेपासून इथेनॉल निर्मिती बंद असल्याने एफआरपी देण्यात अडथळे

मुंबई : सद्यस्थितीत इथेनॉल निर्मितीवर निर्बंधामुळे आणि साखरेच्या किमान विक्री मूल्यात घट झाल्यामुळे बहुतांश साखर कारखाने बंद पडतील, अशी भीती राज्यातील कारखानदारांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने साखरेपासून इथेनॉल निर्मितीला घातलेल्या लगामानंतर साखर कारखन्यांना आर्थिक संकटाचा समाना करावा लागत आहे. केंद्राने १८ लाख टन अतिरिक्त साखर इथेनॉलकडे वळवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड (एनएफसीएसएफ) ने केली आहे. सद्यस्थितीत एफआरपी देण्यात अडथळे येत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

राज्यातील साखर कारखानदारांनी नुकतेच निवेदन दिले आहे. ‘एनएफसीएसएफ’च्या सदस्यांनी अलीकडेच केंद्रीय अधिकाऱ्यांची भेट घेतली. यात अतिरिक्त साखरेपासून इथेनॉल निर्मितीला परवानगी दिली तरच साखर कारखानदायर शेतकऱ्यांना रास्त आणि किफायतशीर किंमत अर्थात एफआरपी देऊ शकतील. त्याचबरोबर खर्चही भागवू शकतील, असे म्हटले आहे. वाढीव आणि अधिकच्या साखर उताऱ्यामुळे हंगामाच्या शेवटी गोदामामध्ये १८ लाख टन साखर असेल. त्यामुळे अतिरिक्त साखरेपासून इथेनॉल निर्मितीला परवानगी द्यावी, अशी विनंती केंद्र सरकारला करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here