पुणे : महाराष्ट्रात 2019-20 गाळप हंगामाची सुरुवात दि. 1 नोव्हेंबरपासून व्हावी, अशी मागणी खाजगी साखर कारखान्यांनी केली आहे. वेस्टर्न इंडिया शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) चे अध्यक्ष बी.बी. थोंबरे म्हणाले, सरकारने ने गाळप हंगाम सुरु करण्याबाबत साखर उद्योगांशी संबंधीत असणार्या अनेक हितचिंतकांच्या सूचना मागवल्या होत्या. पण पुरामुळे विस्माने कोल्हापूर, सातारा आणि सागली येथील गाळप हंगाम दि. 1 नोव्हेंबर पासून सुरु करण्याची शिफारस केली होती.
पश्चिम महाराष्ट्रातील पुरामुळे ऊसाचे मोठे नुकसान झाले. थोंबरे म्हणाले, मराठवाड्यात दुष्काळाचा परिणाम साखर कारखान्यांवर होत आहे आणि येथील बराच ऊस चार्यासाठी वापरला गेला आहे. जर हंगाम लवकर सुरु नाही झाला, तर चार्यासाठी अधिक ऊस वापरला जाण्याची शक्यता आहे. म्हणून, कारखानदारांद्वारा 1 डिसेंबर ला हंगाम सुरु करण्यासाठी सुचवलेल्या प्रस्तावातून मदत मिळणार नाही. थोंबरे म्हणाले, मंत्र्यांच्या समितीच्या बैठक़ीत हंगाम सुरु करण्याच्या बाबतीत अंतिम निर्णय घेतला जाईल. ते म्हणाले, सध्या विधानसभा निवडणूकांमुळे आचार संहिता लागू झाली आहे, त्यामुळे निवडणुकानंतर निर्णय होण्याची संभावना आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका 21 ऑक्टोबर ला आणि मतमोजणी 24 ऑक्टोबरला होणार आहे. महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्यांनी पहिल्यांदा 1 डिसेंबरला नवा हंगाम सुरु व्हावा, अशी मागणी केली होती. सातारा, सांगली, कोल्हापूर मध्ये आलेल्या पुरामुळे झालेले नुकसान आणि मराठावाडा, अहमदनगर आणि सोलापूरात असणारा दुष्काळ यामुळे कारखानदारांनी ही मागणी केली होती.
2019-20 हा नवा साखर हंगाम आता अगदी तोंडावर आहे. आणि महाराष्ट्रात 56 साखर कारखान्यांकडे 397.96 करोड रुपये शेतकर्यांना देय आहेत. एकूण 23,293.82 करोड रुपये थकबाकी आहे, ज्यामध्ये कारखान्यांनी आतापर्यंत 22,915.62 (98.38 टक्के) रुपयांची देणी भागवली आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.