पुणे : महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 22 साखर कारखान्यांनी ऊस गाळप बंद केले आहे. अनेक साखर कारखाने यंदा ऊसाच्या कमीमुळे अडचणीत आहेत. या हंगामामध्ये राज्यातील साखर कारखान्यांना पूर आणि दुष्काळामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. यामुळे कितीतरी कारखान्यांनी ऊस गाळपामध्ये भाग घेतला नाही.
साखर आयुक्तालयाच्या अहवालानुसार, 26 फेब्रुवारी, 2020 पर्यंत 22 साखर कारखान्यांनी गाळप बंद केले. ज्यामध्ये 10 औरंगाबाद, 3 अहमदनगर, 3 सोलापूर, 4 पुणे ,1 कोल्हापूर आणि अमरावती 1 असे साखर कारखाने सामिल आहेत. सध्या तरी आतापर्यंत साखर कारखान्यांनी 447.24 लाख टन ऊस गाळप करुन 11.01 साखर रिकवरीच्या हिशेबाप्रमाणे 492.39 लाख क्विंटल, अर्थात जवळपास 49.23 लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. सध्याच्या हंगामा दरम्यान राज्यात 143 कारखान्यांनी गाळपात भाग घेतला होता.
महाराष्ट्रातील पश्चिम भागात महापूर आणि मराठवाड्यातील दुष्काळामुळे ऊस पिकावर मोठा परिणाम झाला होता. मराठवाड्यात तर मोठ्या प्रमाणात ऊसाचा वापर जनावरांसाठी चार्याच्या रुपात करण्यात आल्यामुळे याचा परिणाम गाळपावर झालेला दिसून येत आहे. ऊस आणि मजूरांच्या कमीमुळे या हंगामात साखर कारखान्यांची कंबर मोडली आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.