मुंबई : देशभरात साखर उद्योगाला गती आली आहे. महाराष्ट्रातील साखर कारखानेही या हंगामात चांगले गाळप करीत आहेत. साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, २० जानेवारी २०२१ अखेर राज्यातील १८२ साखर कारखानयांनी ऊस गाळप सरू ठेवले आहे.
राज्यात आतापर्यंत ५६०.३६ लाख टन उसाचे गाळप झाले असून ५४८.५५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्यात सरासरी साखर उतारा ९.७९ टक्के इतका राहिला आहे. चालू हंगामात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उसाची उपलब्धता आहे. वेळेवर गळीत हंगाम सुरू राहिल्याने गेल्यावेळच्या गळीत हंगामाच्या तुलनेत यावर्षी साखरेचे उत्पादन जादा होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश आणि अन्य राज्यांतील साखर कारखान्यांच्या तुलनेत यावर्षी महाराष्ट्रातील कारखान्यांची कामगिरी चांगली आहे.