मुंबई: देशभरात ऊस हंगाम गतीने सुरू आहे. महाराष्ट्रातही यंदाचा साखर हंगाम वेळेवर सुरू झाल्यामुळे साखर कारखाने चांगली कामगिरी करीत आहेत.
साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, ३० जानेवारी २०२१ अखेर राज्यातील १८२ साखर कारखान्यांकडून ऊस गाळप सुरू आहे. राज्यामध्ये ६३२.८ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले असून आतापर्यंत ६२९.२१ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ९.९४ टक्क्यांवर आहे.
महाराष्ट्रात सध्याच्या हंगामात उसाची जादा उपलब्धता आणि वेळेवर गळीत हंगामाचे सत्र सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा जादा साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेश आणि अन्य राज्यांमध्येही साखर हंगामाने जोर धरला आहे. तेथील साखर कारखान्यांकडूनही चांगले साखर उत्पादन केले जात आहे.