पुणे : राज्यातील सर्व कारखान्यांनी गाळप हंगाम २०२४- २५ साठी त्यांच्याकडे नोंद झालेल्या शेतकरीनिहाय ऊस क्षेत्राची माहिती साखर आयुक्तालयाने विकसित केलेल्या ‘महा ऊस नोंदणी’ या पोर्टलवर १५ जूनपर्यंत भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, साखर कारखान्यांनी दिलेल्या माहितीत विसंगती आढळल्यास संबंधितांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. ‘महा ऊस नोंदणी’ पोर्टलमुळे राज्यातील ऊस क्षेत्र, गाळप आणि साखर उत्पादनाचा अचूक अंदाज बांधणे शक्य होणार आहे.
…तर गाळप परवाना मिळणार नाही
राज्यातील जे कारखाने ही माहिती भरणार नाहीत, अशा साखर कारखान्यांन्या गाळप हंगामासाठी गाळप परवाना दिला जाणार नसल्याचा थेट इशारा साखर आयुक्तालयाने दिला आहे. राज्याचे साखर संचालक (प्रशासन) राजेश सुरवसे यांनी सर्व सहकारी, खासगी कारखान्यांना ऊस नोंदणीची माहिती ऑनलाइन भरणे बंधनकारक केले आहे.
…अशी करा ऊस नोंदणी
ऊस नोंदणीची माहिती http:///usnondani. maha- info. com / यावर कारखाना कार्यक्षेत्रातील गावनिहाय सभासदांचे जाऊन भरणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील गाळप हंगामात ऊस उत्पादन, ऊस गाळप, साखर उत्पादनाचा अचूक अंदाजासाठी राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या माहितीचे डिजिटायझेशन करण्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे. माहिती भरण्यासाठी ऊस नोंद क्षेत्र, बिगर सभासदांचे ऊस नोंद क्षेत्र, सर्वप्रथम लॉगीन करणे आवश्यक आहे.
आयुक्तालयाने घेतली कारखान्यांची कार्यशाळा…
कारखाना कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांचे गाळप परवान्यासाठी जो युझर आयडी व पासवर्ड करारांतर्गत ऊस नोंद क्षेत्र, राज्याबाहेरील ऊस वापरण्यात येतो, तो येथे वापरावा. ऊस नोंदणीची उत्पादकांचे करारांतर्गत ऊस नोंद क्षेत्राची माहितीची एक्सेल फॉरमॅट डाऊनलोड करा. या फॉरमॅटमध्ये एकत्रित नोंद करणे आवश्यक आहे. याबाबतची कारखान्यांची कार्यशाळाही आयुक्तालयाने नुकतीच घेतलेली आहे.