पुणे : साखर आयुक्तालयामध्ये साखर आयुक्त डॉ . कुणाल खेमनार यांच्या हस्ते पहिल्या टप्प्यात सहा प्रादेशिक कार्यालयांना न्यू बोलेरो गाड्यांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी राज्याचे कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे उपस्थित होते.साखरेची प्रादेशिक कार्यालय सक्षम होण्याच्या दृष्टीने डॉ . कुणाल खेमनार यांनी यासाठी पाठपुरावा केला आणि सर्व प्रादेशिक कार्यालयांना वाहने देण्याचे नियोजन करण्यात आले. याशिवाय आठ प्रादेशिक कार्यालयांना 18 लॅपटॉपचे वितरणही करण्यात आले.प्रादेशिक सहसंचालक, उपसंचालक आणि विशेष लेखा परीक्षक यांना लॅपटॉपचे वितरण करण्यात आले.
प्रादेशिक कार्यालय प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये साखर आयुक्त कार्यालयातून पदोन्नत झालेले आदरणीय राजेश सुरवसे (अप्पर निबंधक प्रशासन) यांचा निरोप समारंभ कार्यक्रमही पार पडला. तसेच नवनियुक्त पदोन्नत साखर संचालक प्रशासन डॉ . केदारी जाधव यांचे स्वागत करण्यात आले. साखर आयुक्तालयामध्ये नवीनच नियुक्त झालेले साखर संचालक विकास महेश झेंडे यांचेही स्वागत करण्यात आले.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.