महाराष्ट्र : इथेनॉल उत्पादनातून साखर कारखान्यांनी मिळवले ३,७४९ कोटी रुपये

पुणे : इथेनॉलच्या १ नोव्हेंबर २०२३ ते ३१ ऑक्टोबर २०२४ या वर्षात देशात पेट्रोलमध्ये मिश्रणासाठी इथेनॉलच्या ८२५ कोटी लिटर निविदा जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यापैकी महाराष्ट्रात ९१ कोटी ४० लाख लिटरच्या निविदा जाहीर करण्यात आल्या होत्या. राज्यातील साखर कारखान्यांनी मंजूर केलेल्या १०२.५१ कोटी लिटरपैकी इथेनॉल वर्षात जुलैअखेर सुमारे ६५ कोटी ६९ लाख लिटरइतका इथेनॉल पुरवठा केलेला आहे. त्यातून कारखान्यांनी ३,७४९ कोटी रुपये मिळाले आहेत. साखर सहसंचालक (उपपदार्थ) अविनाश देशमुख यांनी ही माहिती दिली.

‘पुढारी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, राज्यातील साखर कारखान्यांनी शुगरकेन ज्यूस, शुगर, शुगर सिरपपासून, बी-हेवी मळी आणि सी- हेवी मोलॅसिसपासूनच्या इथेनॉलचा पुरवठा ऑइल कंपन्यांना केलेला आहे. शुगर सिरप, बी- हेवी मोलॅसिस, सी- हेवी मोलॅसिसद्वारे इथेनॉलकरिता १०२ कोटी ५१ लाख लिटर इतके वाटप करण्यात आले. त्यामध्ये जुलैअखेर सहकारी, खासगी, स्टँडअलोन डिस्टलरीकडून एकूण ६५.६९ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा पूर्ण करण्यात आला आहे. केंद्र सरकारने ७ डिसेंबर २०२३ रोजीच्या अधिसूचनेद्वारे इथेनॉल निर्मितीसाठी उसाचा रस, शुगर सिरप न वापरण्याचे निर्देश दिलेले होते. ती बंदी हटवल्याने कारखान्यांना दिलासा मिळाला आहे. मध्यंतरीच्या इथेनॉलवरील निर्बंधामुळे अडीच हजार कोटींनी उलाढाल घटली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here