मुंबई: हंगामाच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्रातून होणारी साखरेची निर्यात उत्तर प्रदेशच्या तुलनेत कमी आहे. आंतरराष्ट्रीय साखरेच्या किंमतीत वाढ झाल्यास निर्यातीतही वाढ होण्याची शक्यता आहे. वेस्ट इंडियन शुगर मिल्स एसोसिएशन (विस्मा) चे अध्यक्ष भैरवनाथ बी थोंबरे यांच्या नुसार, यावर्षी साखर निर्यातीत भारत 50 लाख टनाचा आकडा पार करु शकेल.
हंगामाच्या सुरुवाती पासूनच अधिकांश निर्यात उत्तर प्रदेशातील कारखान्यांकडून झाली आहे, यात महाराष्ट्र आणि इतर राज्ये पिछाडीवर आहेत. दोन वर्षानंतर साखरेच्या अतिरिक्त उत्पादनानंतर, जागतिक साखर बाजारात साखरेची कमी दिसत आहे. साखर उद्योगातील जााणकारांच्या म्हणण्याप्रमाणे भारत, थायलंड आणि यूरोपीयन यूनियनच्या साखर उत्पादनातील कमीमुळे जागतिक साखरेत घट होत आहे.
भारत सरकार ने देशातील साखरेचा अतिरिक्त साठा कमी करण्यासाठी 2019-20 हंगामा दरम्यान 60 लाख टन साखर निर्यातीला अनुमती दिली आहे. यासाठी सरकार सुध्दा आर्थिक मदत करणार आहे. गेल्या वर्षी सरकारने साखर स्टॉक कमी करण्यासाठी
2019-20 साठी 10,448 रुपए प्रति टन साखर निर्यातीला अनुदान मंजूर केले होते.
गेल्या हंगामाातील निर्यातीसाठी केंद्र सरकारकडून अनुदान मिळण्यात झालेला उशिर आणि अर्थिक चणचणीमुळे महाराष्ट्रात साखर कारखाने निर्यातीत वाढ करु शकले नव्हते. पण आता अंतर्राष्ट्रीय बाजारात गती आल्यामुळे महाराष्ट्रातील साखर कारखानेही निर्यातीसाठी पुढे येत आहेत.