पुणे : महाराष्ट्रातील गळीत हंगात जोरदार सुरू आहे. काही साखर कारखान्यांनी २०२०-२१ या गळीत हंगामातील गाळपही आटोपत आले आहे. राज्यातील साखर कारखान्यांनी उसाची एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. १५ फेब्रुवारीपर्यंतचे जवळपास ८२.०९ टक्के एफआरपीचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले आहेत. साखर कारखान्यांनी या हंगामात ११६३०.२५ कोटी रुपये देण्यात यश मिळवले आहे. तर कारखान्यांकडे अद्याप २५३५.९६ कोटी रुपये थकीत आहेत.
याबाबत उपलब्थ माहितीनुसार, साखर आयुक्तालयाकडून तयार करण्यात आलेल्या नव्या अहवालात म्हटले आहे की, कारखानदारांनी २०२०-२१ या साखर हंगाात शेतकऱ्यांना ११६३०.२५ कोटी रुपये एफआरपी दिली आहे. जवळपास १८३ साखर कारखान्यांनी ६४१.०७ लाख टन उसाचे गाळप केले आहे. गेल्या हंगामात याच कालावधीत कारखान्यांनी एफआयपीचे ८८.८२ टक्के म्हणजेच ६७८०.५९ कोटी रुपये दिले होते. आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, १५ फेब्रुवारीपर्यंत एकूण १४१६०.२६ कोटी रुपये थकीत होते. त्यापैकी कारखान्यांनी शेतकऱ्यांना ११६३०.२५ कोटी रुपये दिले आहेत. गेल्यावर्षी याच कालावधीत ७६३३.७० कोटी रुपये एफआरपी होती. त्यापैकी ६७८०.५९ कोटी रुपये कारखानदारांनी दिले होते. जवळपास १४० साखर कारखान्यांनी गाळप केले होते. आणि आतापर्यंत ३३२ लाख टन उसाचे गाळप केले होते.