पुणे: महाराष्ट्रातील गळीत हंगाम सध्या अखेरच्या टप्प्यात आहे. साखर उद्योगातील तज्ज्ञांच्या अंदाजानुसार यंदा राज्यातील साखर उत्पादन १०२ लाख टनापर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. मात्र, साखर आयुक्तालयाने हे उत्पादन ९५ लाख टनापर्यंत होईल असे अनुमान काढले आहे.
राज्यातील खासगी साखर कारखानदारांची शिखर संस्था असलेल्या वेस्ट इंडियन शगर मिल्स असोसिएशनचे (डब्ल्यूआयएसएमए) अध्यक्ष भैरवनाथ ठोंबरे यांनी सांगितले की, संस्थेने चर्चा आणि पडताळणी केल्यानंतर १०२ लाख टन साखर उत्पादनाचा निष्कर्ष काढला आहे. सोलापूरमध्ये आधीच काही साखर कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. येत्या काही दिवसांत आणखी काही साखर कारखाने बंद होतील. अहमदनगर आणि मराठवाडा येथील साखर कारखाने मार्च अखेरीपर्यंत सुरू राहतील अशी अपेक्षा आहे. कोल्हापूर, पुणे, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांतील साखर कारखाने एप्रिल अखेरपर्यंत सुरू राहतील असा अंदाज आहे. आतापर्यंत राज्यात ८२ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.
अध्यक्ष ठोंबरे यांच्यासह खासगी साखर कारखानदारांनी सुरुवातीला १०८ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज वर्तवला होता. त्यात सुधारणा करून आता १०२ लाख टन साखर उत्पादनाचे अनुमान व्यक्त केले आहे.