महाराष्ट्र : पुणे विभागाचा साखर उतारा ११ टक्क्यांवर

पुणे : राज्यातील २०२०-२१ या वर्षातील साखर हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सोलापूर विभागातील सर्व साखर कारखान्यांचे गाळप हंगाम पूर्ण झाला आहे. इतर विभागातील साखर कारखाने बंद होण्याच्या मार्गावर आहेत. राज्यात आतापर्यंत १६ एप्रिल २०२१ अखेर १४४ कारखाने बंद झाले आहेत.

पुणे विभागातील कारखान्यांबाबत पाहिले तर या हंगामात ३१ साखर कारखान्यांनी गाळप हंगामात भाग घेतला. त्यातील आतापर्यंत १८ साखर कारखान्यांचे गाळप बंद झाले आहे. पुणे विभागात २२६.२१ लाख टन उसाचे गाळप केले असून २४७.०८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. या हंगामातील साखरेचा उतारा ११ टक्क्यांवर आहे. आतापर्यंत १०.९२ टक्के सरासरी साखर उतारा आहे.

साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, १६ एप्रिल २०२१ अखेर राज्यातील १९० साखर कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला. राज्यात ९९५.८७ लाख टन उसाचे गाळप झाले असून १०४३.४७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.४८ टक्के इतका आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here