पुणे : साखर आयुक्त कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी मशिनमालक संघटनेकडून विविध मागण्यांसाठी सोमवारी (ता. १०) आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मागण्या पूर्ण नाही झाल्या तर राज्यातील 1300 मशिनमालक मशिनसह साखर संकुल आणि मंत्रालयाला घेराव घालतील, अशा इशारा यावेळी देण्यात आला. मार्च महिन्यामध्ये मागण्या पूर्ण झाल्या नाही तर १० एप्रिलपासून संपूर्ण राज्यातील मशिन घेऊन मुंबई येथे मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
संघटनेचे सचिव अमोलराजे जाधव म्हणाले, गेल्या पाच वर्षांपासून आमच्या मागणीसाठी लढा देत आहोत. परंतु सरकार केवळ आश्वासनच देत आहे. यावेळेस जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आंदोलनाचे स्वरूप उम्र करणार आहोत. आंदोलनात महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी मशिन मालक संघटनेचे सचिव अमोलराजे जाधव, संजय साळुंके, सागर पाटील, गणेश यादव, जगन्नाथ सपकाळ, अभय कोल्हे, धनंजय काळे, जयदीप पाटील, तुषार पवार यांच्यासह राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील मशिन मालक सहभागी झाले होते.
ऊस तोडणी मशिनमालकांच्या प्रमुख मागण्या…
ऊसतोडणी मशिनचा तोडणीदर ५० टक्क्यांनी वाढवून द्यावा, बँकेचे हप्ते आहेत त्या परिस्थितीत तीन वर्षे मुदतवाढ मिळावी, पाचट कपात १.५ टक्का असावी, मशिनचे तोडणीदर, वाहतूकदर वाढविण्यात यावेत, २०१९ पासून जवळपास ९०० मशिनला अनुदान मिळालेले नाही, ते अनुदान देण्यात यावे.
महत्त्वाच्या बातम्या:
सोलापूर : बंद अवस्थेतील आदिनाथ कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरु, २० उमेदवारी अर्जाची विक्री
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.