मुंबई : महाराष्ट्रमध्ये ऊसतोडणी मजुरांनी 2020-21च्या साखर हंगामापासून आपल्या पगारात वाढ करून तो 400 रुपये प्रति टन करण्याची मागणी केली आहे. सध्या मजुरांना 280 रुपये प्रति टन पगार दिला जातो. प्रत्येक हंगामात,जवळपास 6-10 लाख तोडणी मजूर गाळप हंगामात भाग घेतात. महाराष्ट्रामधील तोडणी कामगार ऊस तोडणीसाठी शेजारील कर्नाटक,तेलंगाणा, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू सह इतर राज्यात जातात.
ऊस कटर आणि ट्रान्सपोर्ट वर्कर्स यूनियन चे अध्यक्ष आणि सेंटर ऑफ इंडिया ट्रेड यूनियन यूनियन चे उपाध्यक्ष डीएल कराड यांनी सांगितले की, ऑक्टोबर 2015 मध्ये लागू करण्यात आलेल्या त्रिपक्षीय कराराचा कालावधी संपला आहे आणि याला नव्या पद्धतीने लागू करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तोडणी मजुरांच्या प्रतिनिधी मंडळाने सांगितले की, हंगाम सुरुवातींच्या आधीच मजुरांची आर्थिक स्थिती खूपच नाजुक झाली आहे. महाराष्ट्र राज्य ऊस तोड कामगार वाहतुक संघटनेचे अध्यक्ष श्रीरंग भांगे यांनी सांगितले की, तोडणी मजुरांना प्रति टन 400 रुपये मजुरी दिली जावी. संघटना पुढच्या आठवड्यात या बाबत सरकारशी संपर्क साधेल.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.