महाराष्ट्र : मराठवाडा, विदर्भात आज पुन्हा वादळी पावसाचा अंदाज

मुंबई : सध्या राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरू आहे. देशात आग्नेय राजस्थानपासून मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारल्याचे हवामान खात्याने सांगितले. त्यामुळे राज्यात पावसाला अनुकूल हवामान आहे. हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला असून विदर्भातील वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांत वादळी वारे, गारपिटीचा इशारा दिला आहे. तर विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आलाय.

बुधवारी विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीने हजेरी लावली आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. बुधवारी बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, परभणी, बीड, लातूर, नांदेड, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाने हजेरी लावली. तर विदर्भ आणि मराठवाड्यात गारपिटीने तडाखा दिला. आता आज पुन्हा विदर्भात आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पावसासह गारपिटीचा इशारा जारी करण्यात आला आहे. दरम्यान पुढील आठवडाभर तरी संपूर्ण जिल्ह्यात आकाश निरभ्र राहून संध्याकाळी ढगाळ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here