पुणे : भारतीय हवामानशास्त्र विभागाने आज (15 फेब्रुवारी) विदर्भातील चार जिल्ह्यांना हलक्या पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. भंडारा, गोंदीया, चंद्रपूर आणि नागपूर या चार जिल्ह्यांचा यात समावेश आहे. येथे हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय, विदर्भातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर राज्यातील काही भागात सकाळी थंडी वाढली आहे. राज्याच्या इतर भागात कोरडे हवामान राहील असा अंदाज आहे.
भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि नागपूर या चारही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगाडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. सद्यस्थितीत देशात उत्तर भारतातील काही भागात थंडीची लाट कायम आहे. पंजाब, हरियाना, पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानच्या बहुतांशी किमान तापमान ८ अंश सेल्सिअस ते १२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. देशात काही ठिकाणी हलका पाऊसही झाला. आग्नेय उत्तर प्रदेश आणि पूर्व मध्य प्रदेशातील काही ठिकाणी गारपीट झाली होती.