देशात महाराष्ट्राची आर्थिक भरारी, देशाच्या जीडीपीत महाराष्ट्राचे १४.२ टक्के योगदान

मुंबई : महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेने देशात गती घेतली आहे. विधान भवनाच्या दोन्ही सदनात सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षणातून हे स्पष्ट झाले आहे. चालू आर्थिक वर्षात महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचा दर १२.१ टक्के राहील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या दरम्यान देशाचा आर्थिक वाढीचा दर ८.९ टक्के राहण्याचा अंदाज आहे. या आर्थिक विकासाच्या वाढीत सर्व्हिस सेक्टरचे योगदान सर्वाधिक असेल. आर्थिक सर्व्हेक्षण अहवालानुसार, कृषी आणि त्याच्याशी संबंधित घटकांच्या वाढीचा दर ४.४ टक्के, उद्योग क्षेत्राच्या वाढीचा वेग ११.९ टक्के आणि सेवा क्षेत्राच्या वाढीचा दर १३.५ टक्के राहील, असे अनुमान आहे.

आर्थिक सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे की, चालू आर्थिक वर्षात पिकांमध्ये ३ टक्के, पशुधनात ६.९ टक्के, मत्स्य पालनामध्ये १.६ टक्के वाढ होऊ शकते. या अहवालानुसार आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्याचा जीएसडीपी ३१,९७, ७८२ कोटी रुपये राहील. चालू आर्थिक वर्षात दरडोई उत्पन्न १,९३,१२१ रुपये राहील. वर्ष २०१९-२० मध्ये दरडोई उत्पन्न १,९६,१०० रुपये होते. मात्र, राज्यात २०२१-२२ मध्ये एफडीआय गुंतवणूक ४८,६३३ कोटी रुपये होते. तर गेल्या आर्थिक वर्षात ते १,१९,७३४ कोटी रुपये होते. आर्थिक आढाव्यानुसार महाराष्ट्रात ऑक्टोबर २०२१ अखेरीस १०,७८५ स्टार्टअप कार्यरत होते. जून २०२० ते डिसेंबर २०२१ या कालावधीत राज्यात १.८८ लाख कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे प्रस्ताव मिळाले. त्यामध्ये ३.३४ लाख लोकांना रोजगार मिळेल असा अंदाज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here