महाराष्ट्रातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाने गती घेतली आहे. हंगाम २०२१-२२ मध्ये राज्यातील साखर उताराही चांगला आहे. साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार हंगाम २०२१-२२ मध्ये २३ जानेवारी अखेर महाराष्ट्रात एकूण १९४ साखर कारखान्यांकडून गाळप सुरू आहे. यामध्ये ९६ सहकारी तर ९८ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. आणि आतापर्यंत ६५९.०६ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६५७.०९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. महाराष्ट्रातील साखर उतारा १० टक्क्यांजवळ पोहोचला आहे. राज्याचा सध्याचा सरासरी उतारा ९.९७ टक्के आहे.
राज्यात सर्वाधिक साखर कारखाने सोलापूर विभागात सुरू आहेत. सोलापूरमध्ये सर्वाधिक ४५ कारखान्यांकडून गाळप सुरू आहे. २३ जानेवारी २०२२ पर्यंत १५६.५९ लाख टन ऊस गाळप झाले आहे. तर १४०.८३ लाख क्विंटल साखर उत्पादन करण्यात आले आहे.