बिजनौर : साखर कारखान्यांनी आगामी गाळप हंगामाची तयारी सुरू केली आहे. कारखान्यांच्या देखभाल, दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. ऑक्टोबरच्या अखेरीस अथवा नोव्हेंबरमध्ये कारखाने सुरू केले जाऊ शकतात. उसाचे क्षेत्र कमी झाले नसल्याने कारखाने वेळेआधीच गाळप सुरू करण्याची शक्यता आहे.
साखर कारखान्यांनी वेळेवर गाळप सुरू केल्यामुळे हंगाम लवकर संपला. यावेळी उसाचे क्षेत्र गेल्यावर्षीच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी पाऊस सुरू होण्यापूर्वीच देखभाल, दुरुस्तीचे सुरू करण्यात आले आहे.
बिलाई साखर कारखान्याचे ऊस विभागाचे महा व्यवस्थापक परोपकार सिंह यांनी सांगितले की, कारखान्याच्या देखभालीचे काम ३२ टक्के पूर्ण झाले आहे. एक नोव्हेंबरपासून गाळप सुरू करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. तर बिजनौर साखर कारखान्याचे ऊस विभागाचे महा व्यवस्थापक राहुल चौधरी यांनी सांगितले की देखभालीचे तीस टक्के काम पूर्ण झाले आहे. कारखाना वेळेवर सुरू करण्याचे प्रयत्न आहेत.
धामपूर, स्योहारा, बिलाईल, बहादरपूर, बरकातपूर, बुंदकी, चांदपूर, बिजनौर, कुल आणि नजीबाबाद या सर्व कारखान्यांमध्ये देखभाल, दुरुस्तीचे काम गतीने सुरू आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link