कोल्हापुर: कोरोना आणि त्यामुळे देशात लागू झालेला लॉकडाउन याचा मोठा परिणाम साखर उद्योगावर होत आहे. आगामी गाळप हंगाम ऑक्टोबर नोव्हेंबर दरम्यान सुरु होणार आहे. पण कारखान्यांना गाळपाच्या दृष्टीनें पुन्हा नव्याने सज्ज होण्यासाठी कारखान्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी आवश्यक असणारे स्पेअर पार्टस लॉकडाउनमुळे पुणे, मुंबईतच आडकले आहेत. त्यामुळे कामे खोळंबली आहेत. यामुळे यंदाच्या गाळप हंगामात अडचणी निर्माण होत आहे.
जिल्ह्यातील साखर कारखाने ऑक्टोबर – नोव्हेंबरपासून सुरु होण्याच्या उंबरठ्यावर असतात. आणि त्या दिशेने त्यापूर्वीच चार महिन्यांपासून कारखान्यात देखभाल दुरुस्तीचे काम सुरु होते. मशिनरींचे ओव्हर ऑईलिंगसह अनेक कामे नव्या स्पेअर पार्टस अभावी रखडलेली आहेत. हे पार्टस पुणे, मुंबई येथून मागवले जातात. पण आता लॉकडाउनमुळे हे पार्टस मागवणे अवघड झाले आहे.
सध्या जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने लाकॅडाउन जाहीर केला आहे. यामुळे बोहरील लोकांसह वाहनांनाही जिल्ह्यात प्रवेश बंदी आहे. त्यामुळे मागणी कळवूनही साहित्याचा पुरवठा अद्याप झालेला नाही.
गरजेचे साहित्य न मिळाल्याने कारखान्याशी संबंधित सर्वच कामे खोळंबून आहेत. कारखाना व्यवस्थापनाने वारंवार सांगून, पाठपुरावा करुनही लॉकडाउन आणि कन्टेन्मेंट झोनमुळे साहित्याची वाहतुक करणे अवघड होवून बसले आहे. ऑक्टोबर पूर्वी कारखान्यांनी कामे पूर्ण करावी लागणार असल्याने व्यवस्थापनही चिंतेत आहे. गाळप हंगामाच्या दृष्टीने करण्यात येणार्या ऊस वाहतुकीच्या वाहनांचे करार पूर्ण झाले आहेत, त्यांना अॅडव्हान्सही दिला आहे. पण त्यातही अडथळे येत आहेत. परिणामी कारखाना व्यवस्थापन हतबल झाल्याचे चित्र आहे.
याबाबत बोलताना ब्रिस्क फॅसिलिटीज कंपनीचे जनरल मॅनेजर व्ही.एच. गुजर म्हणाले, कारखान्याच्या तांत्रिक दुरुस्तीसाठी लागणार्या विविध पार्टसच्या र्आर्डर्स संबधित पुरवठादारांकडे दिल्या आहेत. पण प्रतिबंधीत क्षेत्रात साहित्य पाठवणे आडचणीचे ठरत आहे, त्यामुळे कामातही अडचणी येत आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.