मक्क्याने वाढवला शेतकऱ्यांच्या आयुष्यातील गोडवा, चाऱ्यासाठी मोठी मागणी

पलामू : गेल्या एक दशकापासून पलामू जिल्हा दुष्काळग्रस्त आहे. येथे थेंबभर पाण्याची जमिनीला प्रतीक्षा आहे. अशा स्थितीत शेती करणे आव्हानात्मक आहे. कारण, कोणत्याही पिकासाठी पाणी लागते. मात्र, आज पलामूमधील प्रगतशील शेतकरी शेतीत तंत्राचा वापर करुन व्यावसायिक शेतीच्या माध्यमातून चांगले पैसे कमावत आहेत. ते इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्त्रोत बनले आहेत.

इटीव्ही भारतने दिलेल्या वृत्तानुसार, पलामू जिल्ह्यातील मक्का उत्पादनाने शेतीचे चित्र पालटले आहे. मक्याच्या शेतीतून शेतकरी मालामाल होत आहेत. त्यातून शेतकऱ्यांना आशेचा किरण दिसू लागला आहे. मक्याच्या पिकाचा चारा राजस्थान, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये पाठवला जात आहे. सतबरवा विभागात ४०० हून अधिक शेतकरी मक्क्याचे उत्पादन करतात. एक शेतकरी यापासून लाखोंची कमाई करीत आहे. २०१७-१८ पासून सतबरवा भागात मक्क्याची शेती सुरू झाली. आता हळूहळू विभागात उत्पादन सुरू आहे. व्यापारी मक्क्याच्या चाऱ्यासाठी आगावू मागणी नोंदवतात. मक्का चारा तीन ते चार रुपये किलो दराने विकत मिळतो. दुधाळ जनावरांसाठी याची मागणी अधिक असते. सतबरवा गावातील शेतकऱ्यांनी स्वयंसाह्यता गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी हायब्रिड बियाणे उपलब्ध केले आहे. शेतकऱ्यांना प्रती एकर ४०,००० रुपये मिळत आहेत. त्यामुळे ते खुश आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here