पंजाब सरकारसह साखगी साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी त्वरीत द्यावी अशी मागणी पंजाबचे माजी मुख्यमंत्री तथा शिरोमणी अकाली दलाचे वरिष्ठ नेते विक्रम सिंह मजीठिया यांनी केली आहे. उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या धर्तीवर पंजाबनेही ऊसाचा दर वाढवावा असे मजिठिया म्हणाले. एका प्रकरणात पंजाब तथा हरियाणा उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर मजिठिया यांनी सांगितले की, स्थानिक कारखान्याने ७२ कोटी रुपये थकवले आहेत. त्यामुळे शेतकरी आंदोलन करीत आहेत. या शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे.
बिझनेस स्टँडर्डमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मजिठिया यांनी पत्रकारांशी बोलताना माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, फेब्रुवारीत राज्याच्या विधानसभा निवडणुकीत चमकौर साहिब आणि भदौरमध्ये पराभव पत्करून त्यांनी इतिहास रचला आहे. चन्नी यांनी सुडाचे राजकारण केल्याची टीका त्यांनी केली. नवज्योत सिंह सिद्धू यांच्यावरही त्यांनी जोरदार टीका केली.