कोची : हवामानात विलक्षण बदल झाल्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड संकटांना तोंड द्यावे लागत आहे. जानेवारी महिन्यात झालेल्या अभूतपूर्व पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या शेतांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे पश्चिम घाटातील शेतकऱ्यांना अधिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे.
तमिळनाडूच्या सीमेवरील इडूक्कीमधील मरयूर गावात दोन महिन्यांहून अधिक काळ निसर्गाचा प्रकोप पहायला मिळाला. इधे भाजीपाला, ऊसासह पिकांचे मोठे नुकसान झाले. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार डिसेंबरच्या अखेरीस मरयूर गावाला धुक्याने लपेटले होते. जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंत धुके कायम राहीले. गावातील मुख्य पीक ऊस, सुपारी आणि भाजीपाला आहे.
हवामान तज्ज्ञ गोपाळकुमार चोलयाल स्लीवेट यांनी सांगितले की, गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात राज्यात प्रचंड थंड हवामान होते. मात्र यावर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भरपूर प्रमाणात पाऊस झाला. यातून हवामान बदल वेगाने होत असल्याचे दिसून येते.
कंठलकोर येथील शेतकरी के. व्ही. मनोज म्हणाले, मी चार एकर क्षेत्रावर ऊस पिकवतो. अनिश्चित हवामानामुळे मला खूप नुकसान सोसावे लागले.