बिद्री साखर कारखान्याचा कारभार पारदर्शक करू : समरजितसिंह घाटगे

कोल्हापूर : बिद्री साखर कारखान्यात चिठ्यांवर लागलेले कर्मचारी चिठ्यांवरच सेवानिवृत्त होत आहेत, याची खंत आहे. आमची सत्ता आल्यानंतर अशा कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावत उपेक्षितांना न्याय मिळवून देऊ. कारखान्यात आम्ही सत्तेवर येताच ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा आणि ऊस विकास कार्यक्रम’ अत्यंत पारदर्शकपणे राबवू, असे आश्वासन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दिले. श्री दूधगंगा वेदगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हाकवे, आणूर, बानगे, मळगे बुद्रुक, मळगे खुर्द, चौंडाळ आदी गावांतील कार्यकर्त्यांच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते.

घाटगे यांनी म्हाकवे, आणूर, मळगे आदी गावांचा दौरा केला. मळगे बुद्रुक येथे प्रमोद अस्वले, बाळकृष्ण कमळकर, बापूसो अस्वले व दिगंबर अस्वले, बालाजी फराकटे, मळगे खुर्द येथे साताप्पा पाटील, राजेंद्र पाटील, प्रकाश पाटील, आणूर येथे दत्तामामा कोईगडे, बाळासाहेब चौगुले, राजश्री चौगुले, श्रीपती खोत, सावंता देवडकर, विजय खोत, चौंडाळ येथे सरपंच मारुती पाटील, उपसरपंच शामराव पाटील, हिंदुराव रेपे, मारुती पाटील यांच्यासह सभासद उपस्थित होते. सरपंच मारुती पाटील यांनी स्वागत केले. आप्पासाहेब रेपे यांनी आभार मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here