बागपत : मलकपूर साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने कारखान्याचा गळीत हंगाम संपुष्टात येत असल्याबाबत घोषणा केली आहे. कारखाना १५ मे रोजी गाळप करून आपल्या सत्राची समाप्ती करणार आहे.
याबाबत दैनिक अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मलकपूर साखर कारखान्याचे युनिट प्रमुख विपिन कुमार यांनी सांगितले की, शुक्रवारी ऊस विभागाचे उप आयुक्त राजेश मिश्रा, जिल्हा ऊस अधिकारी आणि इतरांनी डॉक्टरांच्या पथकांसह कारखान्याची पाहणी केली. त्यांनी कारखान्यात गाळपाविना शिल्लक उर्वरित उसासह कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या उसाच्या सर्व्हेबाबत माहिती घेतली. कारखान्यातील ऊसाचे गाळप १५ मे पर्यंत करून कारखान्याच्या हंगामाची समाप्ती करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी आपला ऊस १५ मे पर्यंत आणावा अशी सूचना त्यांनी केली. जिल्हा ऊस अधिकारी डॉ. अनिल कुमार भारती यांनी सांगिते की, कारखान्याने गळीत हंगाम समाप्तीची घोषणा केली आहे. पूर्ण उसाचे गाळप झाल्याशिवाय कारखाना बंद केला जाणार नाही.