लिलाँग्वे : आफ्रिकेतील देश मलावीच्या सरकारने कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्याने स्थानिक साखर कारखाने बंद करण्याचा आदेश दिला आहे. कारखान्याच्या तपासणी झालेल्या ३१ कामगारांपैकी १९ जण पॉझिटिव्ह आहेत. प्रसार माध्यमातील वृत्तानुसार २२ ते २४ एप्रिल यांदरम्यान हे कर्मचारी भारतातून मलावीला आले आहेत.
आरोग्य आणि लोकसंख्या सेवा मंत्री खंबे कांदोडो-चिपोंडा यांनी कारखान्याचे गाळप थांबविण्याचे आदेश दिले आहेत. कांदोडो-चिपोंडा यांनी सांगितले की, कोविडची टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या भारतीयांपैकी एकाचा सोमवारी मृत्यू झाला. इतर कर्मचाऱ्यांच्या १६९ नमुन्यांपैकी २२ पॉझिटिव्ह आहेत. कांदोडो-चिपोंडा हे राष्ट्रपतींनी कोविड १९ रोखण्यासाठी स्थापन केलेल्या टास्क फोर्सचे सह अध्यक्षही आहेत.