मलेशियाचा साखर उत्पादनांची निर्यात वाढवण्याचा विचार

क्वाललंपुर : एमएसएम मलेशिया होल्डिंग्स ने आतापर्यंत 200,000 टन साखर उत्पादनांची निर्यात केली आहे, जी या वर्षी विदेशामध्ये आपल्या 350,000 टन शिपिंग च्या अगदी जवळ आहे. एमएसएम सुमहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दातुक खैरील अनुर अजीज यांनी सांगितले की, साखर उत्पादनाचे लक्ष्य जवळपास आरएम 600 मिलियन उत्पन्ना मध्ये बदलण्याचे प्रयत्न सुरु आहेत . खैरील अनुर म्हणाले, शुगर रिफायनरी, एमएसएम जी समग्र रणनितीचा केंद्रबिंदु आहे. ज्यामुळे चांगला रिझल्ट मिळत आहे. खैरिल अनुर यांनी एमएसएम च्या वार्षिक सर्वसाधारण बैठक़ीनंतर समारंभास संबोधित केले.

ते म्हणाले, कंपनी 2020 वित्तीय वर्ष (एफवाय20) साठी विक्री कोटा वाढवणे आणि 350,000 टन साखर उत्पादनांच्या निर्यातीला गती देणे यासाठी कार्यरत आहे.

ते म्हणाले, यावर्षी मे पर्यंत एमएसएम ने जवळपास 73,000 टन पेक्षा अधिक परिष्कृत, तरल साखर आणि सिरपची निर्यात केली होती. ज्याचे उत्पन्न आरएम157 मिलियन होते. आम्हाला उत्पन्न वाढवणे आणि एमएसएम रिफाइनरीची क्षमता वाढवण्याचा आंदाज आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये याच्या व्यावसायिकीकरणानंतर एमएसएम रिफाइनरी आपल्या उच्चतम 34 टक्के उपयोग स्तरावर पोचली आहे. यामुळे घरगुती आणि निर्यात मागणीत वाढ होण्याबरोबरच समूहाच्या उत्पादन योजना मजबूत करण्याची आशा आहे. ते म्हणाले की, एमएसएम आपल्या पैरेंट कंपन्या एफजीव्ही होल्डिंग्ज बीएचडी सोबत काम करत आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here