पेटालिंग जया : मलेशियामध्ये साखरेच्या किमती वाढवाव्यात की नाही याविषयी विचार-विनिमय सुरू आहे. देशांतर्गत व्यापार आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे महासचिव अजमान मोहम्मद यूसुफ यांनी सांगितले की, या वर्षी विविध हितधारकांसोबत चर्चेनंतर कॅबिनेटमध्ये एक अहवाल सादर केला जाईल अशी शक्यता आहे.
त्यांनी सांगितले की, साखरेच्या किमती वाढवाव्यात की नको याविषयीचा निर्णय कॅबिनटमध्ये होईल. सद्यस्थितीत देशांतर्गत घाऊक रिफाईंड साखरेची किंमत RM2.69 (S$0.85) प्रती किलोग्रॅमवर मर्यादीत आहे. MSM मलेशिया होल्डिंग्स Bhd सह साखर उद्योगातील घटकांनी सरकारकडे कच्च्या मालाची आणि मालाच्या चढणी-उतरणीच्या खर्चात वाढीमुळे साखर दराचा आढावा घेऊन दरवाढ करण्याची मागणी केली आहे. जर साखरेची दरवाढ केली तर रेस्तरा, बेकरी उत्पादक आपल्या किमती वाढवू शकतात. रेस्तरां आणि ब्रिस्टो ओनर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष जेरेमी लिम यांनी सांगितले की, साखरेचा वापर हा आमच्या एकूण खाद्यपदार्थ उत्पादनातील एक छोटा घटक आहे. मात्र, जर साखरेच्या दरात वाढ झाली तर त्याचा परिणाम कोणत्या ना कोणत्या उत्पादनाच्या किंमतीवर होईल. त्यांनी सांगितले की, खाद्यपदार्थ उत्पादकांना हा अतिरिक्त उत्पादन खर्च अखेर ग्राहकांवर टाकावा लागेल.