साखरेचा दर वाढविण्याची मलेशियात मागणी

क्वालालंपूर : MSM Malaysia Holdings Bhd सह साखर उद्योगातील सर्व घटकांनी कच्चा माल आणि माल वाहतुकीच्या खर्चात वाढ झाल्यामुळे साखरेची दराचा आढावा घेण्यासाठी सरकारशी संपर्क साधला आहे. MSM समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सैयद फिजल सैयद मोहम्मद यांनी सांगितले की, देशांतर्गत घाऊक रिफाइंड साखरेचा दर सद्यस्थितीत RM2.69 प्रती किलोग्रॅम (kg) वर मर्यादीत आहे. जेव्हा तुम्ही याला सर्व उत्पादन खर्च जोडता, तेव्हा सामान्यतः उत्पादन खर्चात २० टक्क्यांची वाढ होते. या बाबी आम्ही सरकारच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. सैयद फिजल सैयद मोहम्मद यांनी सांगितले की, २०११ पासून आतापर्यंत आम्ही केवळ एक सेन प्रती किलोग्रॅम (one sen per kg) निव्वळ दरवाढ केली आहे. महागाई आणि इतर खर्चाच्या तुलनेत ही दरवाढ काहीच नाही.

सैयद फिजल यांनी सांगितले की, MSM आणि Central Sugar Refinery Sdn Bhd (CSR) सह प्रमुख स्थानिक साखर उत्पादकांनी गेल्या काही महिन्यांत अनेक मंत्रालयांसमवेत व्यापक चर्चा केली आहे. ते म्हणाले की, सरकार एक नवीन आणि व्यापक साखर विक्री दर निर्धारण करेल असा विश्वास साखर उद्योगाला आहे. साखरेच्या किमतींचा परिणाम सर्वसामान्य लोकांवर होईल याबाबत विचारले असता सैयद फिजल म्हणाले की, या वाढीचा सर्वसामान्य लोकांवर फार मोठा परिणाम होणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here