पुत्रजया, मलेशिया : साखरेची साठेबाजी अथवा सार्वजनिक सुरक्षेअंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्याची मोहीम ३१ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे, असे देशांतर्गत व्यापार आणि कॉस्ट ऑफ लिव्हिंग खात्याचे मंत्री (केपीडीएन) अंमलबजावणी महासंचालक दातुक अजमान ॲडम यांनी सांगितले. ऑप्स मॅनिस अभियान गेल्या महिन्यात संपुष्टात येणार होते. याबाबत अजमान यांनी सांगितले की, ३ मे रोजी सुरू करण्यात आलेले ऑप्स मॅनिस अभियान देशात साखरचा स्थिर पुरवठा आणि वितरण करण्यात यशस्वी ठरले आहे. यासोबतच यातून सरकारकडून निश्चित करण्यात आलेल्या दरांवर ग्राहकांना वस्तू मिळणेही सुलभ बनले आहे.
त्यांनी शुक्रवारी (७ जुलै) येथे ऑप्स मॅनिस आणि ऑप्स टिरिसच्या व्यवस्थापनाविषयी आयोजित एका परिषदेत सांगितले की, लोक चिंतीत होवू नयेत आणि त्यांच्याकडून भीतीपोटी जादा खरेदी होवू नये यासाठी आम्ही काम करीत आहोत. मोठ्या आणि रिफाईंड साखरेची किंमत अनुक्रमे RM२.८५ प्रती किलो आणि RM२.९५ प्रती किलो निश्चित करण्यात आली आहे. खरेतर क्लिअर रिफाईंड सफेद साखरेचा दर बाजाराकडून निश्चित केला जातो. अजमान यांनी संगितले की, ३ मेपासून ३० जुनपर्यंत ऑप्स मॅनिस अंतर्गत देशभरात ६,२७६ ठिकाणच्या पाहणीत एकूण २० प्रकरणांची नोंद करण्यात आली.
ते म्हणाले की, नोंदविण्यात आलेल्या प्रकरणामध्ये निर्धारीत केलेल्या दरापेक्षा अधिक दराने साखर विक्री करणे अथवा विक्री दराबाबत खोटी माहिती देणे याचा समावेश आहे. ऑप्स टिरिसबाबत ते म्हणाले की, अनुदानीत डिझेलचा दुरुपयोग रोखणे हा याचा उद्देश आहे. अजमान यांनी सांगितले की १ मार्च ते ५ जुलैपर्यंत देशभरात ७,६२५ निरीक्षणे करण्यात आली. या माध्यमातून RM२७.०३ mil किमतीचे ३.३६ मिलियन लिटर डिझेल जप्त करण्यात आले. ते म्हणाले की, मंत्रालयाने गुन्ह्यांसंबंधी २८२ जणांना अटक केली आहे. यामध्ये २२० स्थानिक तर ६२ विदेशी व्यक्तींचा समावेश आहे.