मलेशिया: रिफायनरींना दर नियंत्रित नसलेल्या साखर विक्रीस परवानगी देण्याच्या निर्णयाबद्दल खासदारांमध्ये चिंता

क्वालालंपूर : देशात सध्या पारंपरिक दर नियंत्रित दाणेदार साखर (price-controlled conventional granulated sugar) विक्री करणाऱ्या दोन रिफायनरींना दर नियंत्रण नसलेली रिफाइंड व्हाइट शुगर जर्निह (यास शुद्ध रिफाइंड व्हाइट शुगरसुद्धा म्हटले जाते /Refined White Sugar Jernih) विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयावर मलेशियातील अनेक खासदारांनी चिंता व्यक्त केली आहे.

या विषयी डोमेस्टिक अँड कॉस्ट ऑफ लिव्हिंग मिनिस्टर दातुक सेरी सलाउद्दीन अयुब यांनी २५ मे रोजी म्हटले होते की, रिफाइंड व्हाइट शुगर जर्निहचा दर बाजाराद्वारे निश्चित केला जाईल. त्यांच्या या वक्तव्यानंतर सरकारच्या या निर्णयाबाबत चर्चा सुरू झाली आहे. मंत्री सलाउद्दीन यांनी सांगितले की, प्रक्रिया केलेली व्हाइट शुगर जर्निह ग्राहकांना नेहमीच्या पांढऱ्या मोठ्या आणि साध्या साखरेशिवाय नवा पर्याय देईल. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाशी ते सहमत आहेत.

त्यांनी या प्रक्रियेशी संलग्न दोन साखर उद्योग कंपन्या MSM मलेशिया होल्डिंग्स Bhd आणि सेंट्रल शुगर्स रिफायनरी Sdn Bhd (CSR) लाही याबाबत सूचना केल्या आहेत. बाजारातील पारंपरिक दाणेदार मोठ्या व साध्या साखरेचा पुरवठा कायम राहावा असा सल्ला त्यांनी दिला आहे.

दातुक रोसोल वाहिद (पीएन-हुलू टैरेंगाणू) यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. की मंत्रालय दर नियंत्रित साखरेच्या पुरवठ्यावर लक्ष ठेवेल. तरच साखरेचा साठा नेहमी उपलब्ध राहिल. दर नियंत्रित आणि दर नियंत्रित साखरेच्या गुणवत्तेत फरक असेल का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. यासोबतच दर नियंत्रण नसलेल्या साखर उत्पादनांची सुरुवात ही सरकारच्या साखरेवरील दर नियंत्रणमुक्त करण्याच्या दिशेने एक पाऊल ठरेल का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सरकारने पुरेसा साखर पुरवठा आणि सामाजिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी पावले उचलली पाहिजेत, असे अजली यूसुफ (पीएच-शाह आलम) यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here